शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

पालिकेने बिले थकवल्याने कंत्राटी कामगारांचा पीएफ कसा भरायचा? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:22 AM

महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे हप्ते २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेले नाही. त्यामुळे पीएफ ठाणे कार्यालयाने पालिकेस नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कंत्राटदारांची बिले जुलै महिन्यापासून थकली आहेत. बिले थकल्याने आपल्याकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या पीएफ कसा भरायचा, असा सवाल कंत्राटदारांनी केला आहे. कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले थकली आहेत.

महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे हप्ते २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेले नाही. त्यामुळे पीएफ ठाणे कार्यालयाने पालिकेस नोटीस बजावली आहे. पीएफची ११० कोटींची थकीत रक्कम कंत्राटदार भरत नसतील, तर पालिकेकडून ती वसूल करण्यात यावी, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोना काळात महापालिकेचा सगळा खर्च हा कोरोनाचा प्रादुर्भाव दूर करण्यावर झाला आहे. अशा परिस्थितीत पीएफ कार्यालयाने नोटीस पाठविल्याने महापालिकेने जुना रेकॉर्ड काढून कंत्राटदारांना पीएफ थकविल्याप्रकरणी नोटिसा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोविड काळात कोणत्याही थकीत रकमेची वसुली सक्तीने करण्यास मनाई आहे. त्यानुसार महापालिका पीएफ लवादाकडे दाद मागण्यासाठी गेली आहे. लवादाने ८ जानेवारीपर्यंत सक्तीच्या वसुलीस स्थगिती दिली होती. लवादापुढील अर्जाला पुढील सुनावणीची तारीख मिळाली आहे. कंत्राटदारांना त्यांची बिले वेळेत मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांचे पीएफचे पैसे कुठून भरणार, असा प्रश्न कंत्राटदार करीत आहेत.

विक्रमी करवसुली काय कामाची?दिवाळीत महापालिका आयुक्तांनी केवळ २५ टक्के थकीत बिलाची रक्कम देण्याची तजवीज केली होती. सध्या महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. तिला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यातून महापालिकेस ३१ डिसेंबरअखेर २०४ कोटी रुपये करवसुली झाली आहे. ७ जानेवारीपर्यंत अभय योजनेची रक्कम मिळून ३४० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या वसुलीपोटी जमा झाले आहेत. एकीकडे कोरोना काळात विक्रमी करवसुली सुरू असताना कंत्राटदारांची बिले थकविली जात आहेत, यावर कंत्राटदारांनी आक्षेप घेतला आहे. बिले दिली, तर कामगारांचा पीएफ भरणे शक्य होईल, असे काही कंत्राटदारांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका