डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी ताे करायचा घरफाेड्या; त्याला पकडण्यासाठी पाेलिसांची झाली महिनाभर दमछाक
By मुरलीधर भवार | Updated: April 12, 2023 14:15 IST2023-04-12T14:15:24+5:302023-04-12T14:15:46+5:30
पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाईल, लॅपटाॅप हस्तगत केले आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा.

डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी ताे करायचा घरफाेड्या; त्याला पकडण्यासाठी पाेलिसांची झाली महिनाभर दमछाक
कल्याण- त्याने मास मिडीयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. याच दरम्यान त्याला डान्सबारचे व्यसन लागले. झटपट पैसा कमाविण्यासाठी ताे बंद घरे हेरुन घरफाेड्या करायचा. ताे एकटाच असल्याने त्याला पकडण्यासाठी पाेलिसांना महिनाभर दमछाक करावी लागली. अखेरीस त्याला खडकपाडा पाेलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव राेशन जाधव आहे. पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाईल, लॅपटाॅप हस्तगत केले आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा.
कल्याणनजीक माेहने परिसरात एका चाेरट्याने घरफाेडी केली हाेती. या घरफाेडीत चाेरट्याने ३५ ताेळे साेन्याचे दागिने चाेरी केले हाेते. ज्या ठिकाणी ही चाेरी झाली त्या इमारतीत सीसीटीव्ही नसल्याने चाेरट्याला पकडण्याचे पाेलिसांपुढे आव्हान हाेते. पाेलिस उपायु्कत सचिन गुंजाळ,सहाय्यक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पाेलिस निरिक्षक सर्जेराव पाटील, पाेलिस निरिक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरु केला. पाेलिसानी घटनास्थळापासून जवळपासचे सीसीटीव्ही तपासले.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने चाेरटा राेशन जाधव याला अटक केली. त्याने माेहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर या भागात घरफाेडीचे आठ गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून पाेलिसांनी ४७ ताेळे साेने, लॅपटाॅप, माेबाईल हस्तगत केले आहेत. राेशन हा उच्चशिक्षित आहे. त्याने मास मिडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात तीन वर्षे काम केले. नाेकरीला असताना त्याला डान्सबारचा नाद लागला. डान्सबारमध्ये पैसा उडावायला ताे चाेरी करु लागला. चाेरी करण्यासाठी ताे दिवसा इमारतींची रेकी करायचा. ज्या इमारतीत वाॅचमन नाही. तसेच सीसीटीव्ही नाही. याची खात्री करुन घ्यायचा. मात्र रात्री त्या इमारतीत जाऊन ताे घरफाेडी करायचा. अखेर ताे सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाेलिसांच्या जाळ्यात अडकला.