नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल बार अन् दुकाने केली सील;  केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 13:58 IST2021-07-11T13:56:01+5:302021-07-11T13:58:35+5:30

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक  हॉटेल, दीक्षा बार आणि डोंबिवलीतील बंदीश पॅलेस बार, साई पूजा बार सील करण्याची कारवाई केली आहे.

Hotel bars and shops that violate the rules are sealed; Action taken by KDMC Additional Commissioner | नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल बार अन् दुकाने केली सील;  केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केली कारवाई

नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल बार अन् दुकाने केली सील;  केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केली कारवाई

कल्याण-कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत र्निबध लागू आहेत. मात्र काल शनिवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दुकाने, हॉटेल आणि बार उघडी होती. ही दुकाने सील करण्याची कारवाई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार केली आहे. 

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक  हॉटेल, दीक्षा बार आणि डोंबिवलीतील बंदीश पॅलेस बार, साई पूजा बार सील करण्याची कारवाई केली आहे. पुन्हा लिंक रोडवरील सिरॅमिक दुकाने, मोमीन टेलीकॉम मोबाईल दुकाने देखील सील करण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रभागातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली.

Web Title: Hotel bars and shops that violate the rules are sealed; Action taken by KDMC Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.