मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसाचा प्रामाणिकपणा, ४० हजार रुपये केले परत

By मुरलीधर भवार | Updated: January 14, 2023 22:26 IST2023-01-14T22:26:24+5:302023-01-14T22:26:24+5:30

Dombivali: डोंबिवलीत गस्त घालणारे मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस विकास माळी यांना रस्त्यावर एक पाकिट सापडले. त्यात ४० हजार रुपये होते.

Honesty of the police in Manpada police station, returned 40 thousand rupees | मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसाचा प्रामाणिकपणा, ४० हजार रुपये केले परत

मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसाचा प्रामाणिकपणा, ४० हजार रुपये केले परत

 - मुरलीधर भवार 
डोंबिवली- डोंबिवलीत गस्त घालणारे मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस विकास माळी यांना रस्त्यावर एक पाकिट सापडले. त्यात ४० हजार रुपये होते. या पाकिटातील पॅनकार्डच्या आधारे त्यानी ते पार्किट श्रीरंग पडवळ यांना परत केले आहे. या घटनेतून पोलिसांचा प्रामाणिकपणा दिसून आला आहे. 
पोलिस माळी हे बंदीश पॅलेस परिसरात गस्त घालत होते. रस्त्यावर एक पाकिट पडले होते. त्यात पॅनकार्ड होते. त्या पॅनकार्डच्या आधारे त्यांनी श्रीरंग पडवळ यांना संपर्क साधला. ते पाकि ट पडवळ यांचेच होते. त्या पाकिटात ४० हजार रुपये होते. पडवळ यांना मानपाडा पोलिस ठाण्यात बोलावून वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या हस्ते ते पाकिट सन्मानपूर्वक परत करण्यात आले. पडवळ यांनी पोलिसाचे आभार मानले आहेत ..

Web Title: Honesty of the police in Manpada police station, returned 40 thousand rupees