केडीएमसीला हेल्थ केअर हिरोज राष्ट्रीय पुरस्कार
By मुरलीधर भवार | Updated: September 10, 2022 20:07 IST2022-09-10T20:07:06+5:302022-09-10T20:07:19+5:30
५२ नामांकनामधून केडीएमसीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

केडीएमसीला हेल्थ केअर हिरोज राष्ट्रीय पुरस्कार
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने गेल्या दोन वर्षात महापालिकेसह आसपासच्या परिसरात विविध नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी उपक्रम राबविल्याने राष्ट्रीय स्तरावरील म्यून्सिपल एक्सलन्स अॅवार्डप्राप्तीसाठी ५२ नामांकनामधून केडीएमसीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदरभार डॉ. विजय सूर्यवंशी स्विकारल्यानंतर कामाला सुरुवात केली. लगेच कोविड जागतीक महामारीचे संकट जगावर कोसळले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आरोग्य सेवा अपुरी असताना
कोविडवर मात करण्यासाठी आयुक्तांसह प्रशासनाने जी मेहनत घेतली. त्याची दखल घेत केंद्र सरकारने कोविड इन्व्होशन हा प्रथम पुरस्कार कल्याण डोंबिवली महापालिकेस दिला. आयुक्त सूर्यवंशी यांनी महापालिका हददीत 9 वाढीव शहरी आरोग्य केंद्रे सुरु केली. कोरोना काळात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. रुग्णालये उभारली. खाजगी आरोग्य सेवा आणि डॉक्टर आर्मिची मदत घेतली.
पिवळी व भगवी शिधापत्रिका मोफत तर पांढरी शिधापत्रिका धारक असलेल्याना आणि नसलेल्या गरजूंना ८४९ रुपयांमध्ये डायलिसीस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कॅथ लॅब आणि कॅन्सर रेडीओथेरपी केंद्र सुरु करण्यात आले आहे. पिवळया व भगव्या शिधापक्षत्रिका धारकांना मोफत तर पांढरी शिधापत्रिका असलेल्या माफक दरात उपचार सुविधा दिली आहे. कल्याणच्या वसंत व्हॅली येथे प्रसूती केंद्र सुरु केले. डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पीपीपी तत्वावर एमआरआय, सिटी स्कॅन, रेडिअेालॉजी या सेवा माफक दरात सुरु करण्यात आलेल्या आहेत.
लहान मुलांसाठी अतिदक्षता कक्ष सुरु केला आहे. कल्याणमधी रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यात आलेल्या आहेत. गौरी पाडा येथे कोरोना टेस्टींग लॅब सुरु केली. तसेच फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कोरोना काळात सुरु केली. या सगळ्य़ा कामाची दखल घेत म्युन्सीपल एक्सलन्स हेल्थ केअर हिरोज हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चार लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.