कल्याण गाळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
By मुरलीधर भवार | Updated: February 17, 2024 17:28 IST2024-02-17T17:27:31+5:302024-02-17T17:28:15+5:30
कल्याण जवळील मोहने परिसरातील गाळेगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला.

कल्याण गाळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
कल्याण-केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विविध प्रभागांमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाचे महापालिकेकडून आयोजन करण्यात आले आहे. आज कल्याण जवळील मोहने परिसरातील गाळेगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात हजारो नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावेळी मयूर पाटील यांनी शासनाने ही योजना राबवल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळाला. त्यांना पायपीट करावी लागली नाही. हा उपक्रम राबवल्याबद्दल नागरीकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभार मानले. या उपक्रमाचा लाभ प्रभागासह आसपासच्या नागरिकांनी लाभ घेतला.
दरम्यान कल्याण वायले नगर वायले मैदानात हा उपक्रम राबवण्यात आला .या उपक्रमात शासनाच्या विविध योजनांसह आरोग्य सेवेचा लाभ नागरीकांनी घेतला. यावेळी नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी गणेश डोईफोडे यांनी दिली.