शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदेसेनेतून हकालपट्टी करा..."; नाराज उमेदवाराचं एकनाथ शिंदेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:19 IST

कैलास शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, हल्ली देशात, राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या राजकारणात एकनिष्ठ असणे, कार्य करणे, सुशिक्षित असणे याला महत्त्व नाही. यामुळे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण : केडीएमसी निवडणुकीसाठी पॅनल क्रमांक १८ मधून इच्छुक असलेले शिंदेसेनेचे उमेदवार कैलास शिंदे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात ‘माझी पक्षातून हकालपट्टी करा’, अशी मागणी केली. या अजब मागणीमुळे त्यांचे पत्र चर्चेचा विषय ठरले. कैलास शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, हल्ली देशात, राज्यात आणि शहरात सुरू असलेल्या राजकारणात एकनिष्ठ असणे, कार्य करणे, सुशिक्षित असणे याला महत्त्व नाही. यामुळे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे.

पैसा असेल तर निवडून येताउमेदवाराची आर्थिक बाजू मजबूत असेल, तर त्याला महत्त्व आहे. पैसा असेल, तरच तुम्ही निवडून येऊ शकता, असा अलिखित नियम बनला आहे. आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणुकीत मी उमेदवारी मिळण्यास पात्र नाही. त्यामुळे माझी पक्षातून हकालपट्टी करावी.  कैलास शिंदे यांनी २०१५ साली निवडणूक लढविली होती व ते विजयी झाले. 

भाजपचे काम करणार नाहीपालिकेत सभागृह नेते आणि गटनेते पद भूषविले होते. महायुतीत भाजप आणि शिंदेसेना एकत्रित निवडणूक लढवित आहे. पॅनल क्रमांक १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी यांना उमेदवारी दिली. भाजपने नेहमीच शिंदेसेनेच्या विरोधात काम केले. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत भाजपचे काम करणार नसल्याचे कैलास शिंदे यांनी सांगितले. 

कागदपत्रांची होळी करणारनिवडणूक आयोगाने बहुसदस्य पद्धतीचा निर्णय घेतला. एक पॅनल हा चार सदस्यांचा असल्याने माझ्यासारखा सामन्य कार्यकर्ता निवडणुकीचा खर्च कसा काय उलचणार, असा प्रश्न शिंदे यांनी केला. निवडणूक लढविण्यासाठी विविध दाखले, ना हरकत प्रमाणपत्रे याची जमवाजमव केली हाेती. या कागदपत्रांची ३१ डिसेंबरच्या रात्री होळी करून निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट निर्णयाचा निषेध करणार असल्याचे कैलास शिंदे यांनी सांगितले. 

उपशहर प्रमुखाचाही पत्ता कटशिंदेसेनेचे उपशहरप्रमुख मनोज चौधरी हेही पॅनल क्रमांक १८ मधून इच्छुक होते. युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यामुळे चौधरी यांनी पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rejected Candidate Demands Expulsion from Shinde Sena Due to Disappointment.

Web Summary : Kalyan: Denied candidacy, Shinde Sena's Kailas Shinde seeks expulsion, citing lack of meritocracy. He criticizes the dominance of money in elections and plans to burn election-related documents in protest. Another leader resigned as seat went to BJP.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदे