गॅस सिलेंडरचा स्फोट, रामदास वाडीतील मैत्रेय बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आग
By मुरलीधर भवार | Updated: May 13, 2024 22:04 IST2024-05-13T22:01:02+5:302024-05-13T22:04:23+5:30
घटना घडली तेव्हा त्या घरामध्ये कोणी नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

गॅस सिलेंडरचा स्फोट, रामदास वाडीतील मैत्रेय बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आग
मुरलीधर भवार, कल्याण: शहराच्या पश्चिम भागातील रामदास वाडी परिसरातील मैत्रेय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला भीषण आग लागल्याची घटना आज रात्री साडेआठ वाजता घडलीआहे. ही घटना घडली तेव्हा त्या घरामध्ये कोणी नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आग विझवण्यासाठी तात्काळ रवाना झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्याने इमारतीमध्ये राहणारे अन्य लोक भयभीत झाले. मात्र ज्या घरात ला आग लागली त्या घरातील लोक बाहेर असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरातील गॅस सिलेंडरचास्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.