शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

चार लाख डोंबिवलीकर अंधारात; पडघ्यात बिघाड; अघोषित भारनियमन, रविवारपर्यंत दुरुस्ती झाल्यास मिळेल दिलासा

By अनिकेत घमंडी | Updated: July 19, 2025 09:20 IST

पडघ्यात तांत्रिक बिघाडानंतर आठवड्यात महापारेषणने  सहा टॉवर युद्धपातळीवर उभे केले आहेत. शनिवारी त्या ठिकाणी काम पूर्ण झाले तर रविवारपासून अखंड वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे.

- अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महापारेषणच्या पडघा येथील पाल २२० केव्ही वीज वाहिनीत अडथळे आल्याने  जुनी वाहिनी बदलून वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात अडथळे येत असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत महावितरणच्या सुमारे ४ लाख ग्राहकांना आठवडाभर फटका बसत आहे. शहरांतील वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने डोंबिवली शहरात अघोषित भारनियमन सुरू केले.

पडघ्यात तांत्रिक बिघाडानंतर आठवड्यात महापारेषणने  सहा टॉवर युद्धपातळीवर उभे केले आहेत. शनिवारी त्या ठिकाणी काम पूर्ण झाले तर रविवारपासून अखंड वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बिघाडाबाबत महावितरण, महापारेषण या यंत्रणांनी चुप्पी साधली. महावितरणच्या डोंबिवली, कल्याण येथील कार्यकारी अभियंत्यांसह अन्य उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत उघडपणे माहिती देणे टाळले. 

एकाच वाहिनीवर विभागाचा भारआठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी असून, उकाड्यात वाढ झाल्याने विजेची मागणी वाढली. त्यात दोन वीज वाहिन्यांऐवजी एकाच वाहिनीतून वीज पुरवठा होत असल्याने सर्व भागाचा भार त्या वाहिनीवर येत आहे. वीज पुरवठ्याचा समतोल साधण्यासाठी महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले. बिले भरमसाट येत असून, वीज पुरवठा मात्र समाधानकारक नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे.

पाणीपुरवठ्यावरही परिणामशहरात गेल्या आठवडाभरात असंख्य वेळा वीज खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या नावाने संताप व्यक्त केला. समाज माध्यमांवर नागरिक व्यक्त झाले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेने पत्र पाठवून महावितरणच्या सतत वीज खंडित होण्यामुळे भोपरसह विविध भागात पाणी समस्या झाल्याचे म्हटले.

या विभागांत पुरवठा राहणार खंडितफिडरचे नाव     विविध वेळाबाजीप्रभू     : १२ ते १, दु. ३ ते ४, संध्या. ६ ते ७, रात्री ९ ते १०एमआयडीसी     : दु. १ ते २, संध्या. ४ ते ५, ७ ते ८, रात्री १० ते ११आनंदनगर     : दु. २ ते ३, संध्या. ५ ते ६, रात्री ८ ते ९, ११ ते १२

डोंबिवली पश्चिमेकडील महावितरणच्या कार्यालयातून गुरुवारी एक भारनियमन नियोजन केलेला (एरियानुसार) तक्ता केलेले पत्र व्हायरल झाले, अघोषित भारनियमन सुरू असल्याची चर्चा  नागरिकांत सुरू झाली आणि दोन्ही यंत्रणांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली