शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीच्या डकमध्ये सापडलं नवजात बाळ; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:24 IST

अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या डकमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ambernath Crime :अंबरनाथमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. अंबरनामध्ये एका स्त्री जातीच्या अर्भकाला इमारतीवरुन खाली फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची आता कसून चौकशी करत आहेत.

अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत सकाळच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याने खळबळ उडाली. नवजात बाळ इमारतीच्या डकमध्ये आढळल्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. या प्रकरणी दोन संशयित महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हे बाळ कुमारी मातेचं होतं का? यासंदर्भातही पोलिसांकडून तपास सुरु आहे.  

इमारतीमधील रहिवाशांनी हे बाळ डकमध्ये पाहिल्यानंतर याची माहिती स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना दिली. उमेश पाटील यांनी तात्काळ पोलिसांना या सगळ्या प्रकाराची  माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या सुमारास हे स्त्री अर्भक जन्माला आलं असून त्याला तिथून फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस