शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

कठोर नियमावलीमुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर फेरले पाणी, स्वच्छतेसह काेरोनाविषयक सर्वच नियमांचे काटेकोर पालन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 11:57 PM

maghi ganpati 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाद्रपद महिन्याप्रमाणे माघी गणोशोत्सवातही सूचना आणि नियमांचे पालन कसे होईल याकडे विशेष लक्ष राहील, असा दावा संबंधित यंत्रणांनी  केला आहे. 

- प्रशांत माने

कल्याण : गेले ११ महिने सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट राहिले आहे. काही सण साजरे करण्यावर पूर्णपणे निर्बंध आले. दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरा झाला. दरम्यान, केडीएमसी क्षेत्रात आजच्या घडीलाही कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५० ते १००च्या आसपास असल्याने उद्यापासून सुरू होणारा माघी गणोशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मनपा आणि पोलीस यंत्रणांवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाद्रपद महिन्याप्रमाणे माघी गणोशोत्सवातही सूचना आणि नियमांचे पालन कसे होईल याकडे विशेष लक्ष राहील, असा दावा संबंधित यंत्रणांनी  केला आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना बंदी आहे. गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा आल्या असून गणेशोत्सवात साजऱ्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करावे याकडे लक्ष वेधले आहे. मंडपात गर्दी टाळण्यासाठी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी ऑनलाइन सुविधांवर भर द्यावा अशा सूचनाही आहेत. मंडप निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रींनिगची पर्यायी व्यवस्था असावी तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या  भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचित करावे असे आदेश मंडळांना पोलीस विभागाच्या वतीने दिले आहेत. तर भाद्रपद महिन्यात जारी केलेल्या नियमांचे माघी गणोशोत्सवातही पालन केले जाणार असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. दरवर्षी मनपातही माघी गणोशोत्सव मोठया थाटामाटात साजरा केला जातो. मनपा मुख्यालयासह डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात पाच दिवस हा उत्सव साजरा होतो.  प्रतिवर्षी चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचे संदेश दिले जातात. भजन, महाप्रसाद, हळदीकुंकू यासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची पाच दिवस रेलचेल असते. परंतु कोरोनाचे सावट असल्याने हे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. गणेशाची मूर्ती साडेसहा फूट उंचीची असते, परंतु यंदा मूर्ती चार फुटांची असणार आहे. केवळ मंडप उभारला असून दर्शनासाठी ४ ते ५ जणांनाच सोडले जाणार आहे.

वयोवृद्ध, लहान मुलांना बंदी गणोशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास सार्वजनिक विसर्जनस्थळी करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, गणोशमूर्तीच्या विसर्जनस्थळी वयोवृध्द व लहान मुलांना बंदी घालण्यात आली असून त्याबाबतच्या सूचना जारी करण्याची जबाबदारीही स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. विसर्जन ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मार्किंग, बॅरीकेडिंग, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचे मार्ग, पुरेसे लाइट, मार्गदर्शक फलक आदींची व्यवस्था करून घेण्याची जबाबदारीही संबंधितांवर दिली गेली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणGanesh Mahotsavगणेशोत्सव