शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या दारातच महिला प्रसूती प्रकरणी डॉ. तृणाली महातेकर निलंबित

By मुरलीधर भवार | Updated: November 27, 2023 17:42 IST

डॉ. तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुरलीधर भवार-कल्याणतीन महिन्यापूर्वी एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता तिला दाखळ करुन घेतले नाही. तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने डॉ. तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

९ सप्टेंबर सायंकाळी ८ वाजता कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील स्कायवा’कवर एका गरोदर महिलेस प्रसूतीच्या वेतना सुरु झाल्या. त्याठिकाणी तिची अवघड अवस्था पाहून पादचारी आणि नागरीकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. तिला रुग्णालयात पोहचविण्याकरीता रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तिला काही हमालांच्या मदतीने हातगाडीवर टाकून रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले गेले. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या स्टाफने महिलेस प्रसूतीकरीता दाखल करुन घेण्यास नकार दिला. पुरेसा स्टाफ नसल्याचे कारण दिले. वसंत व्ह’ली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. वसंत व्ह’लीला जाण्या इतपत वेळ नाही. तिची अडलेली अवस्था पाहून पोलिसांनी या महिलेला प्रसूती करीता दाखल करुन घ्या, अशी विनंती कार्यरत असलेल्या स्टाफकडे केली होती. कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि स्टाफने पोलिसांची विनंती ही मानली नाही.

महिलेस दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारातच झाली. या प्रकरणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत आंदोलन केले. या घटनेस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाईची जोरदार मागणी केली. या प्रकरणाची दखल घेत तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची चौकशी समिती नेमली. या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. या चाैकशी समितीने चौकशी करुन गरोदर महिलेस प्रसूतीकरीता दाखल करुन घेण्यास डॉ. महातेकर या जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी डॉ. महातेकर यांना निलंबित केले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhospitalहॉस्पिटलkalyanकल्याण