Dombivali: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

By अनिकेत घमंडी | Published: June 7, 2024 03:41 PM2024-06-07T15:41:11+5:302024-06-07T15:41:35+5:30

Indian Railway News:मुंबईहून कसारा दिशेकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना अटगाव स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली, त्या घटनेमुळे कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच उकाडा असह्य झाल्याने प्रवासी हैराण झाले होते.

Dombivali: Engine failure of Janshatabdi Express | Dombivali: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

Dombivali: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

- अनिकेत घमंडी 
डोंबिवली - मुंबईहून कसारा दिशेकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना अटगाव स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली, त्या घटनेमुळे कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच उकाडा असह्य झाल्याने प्रवासी हैराण झाले होते. त्यात या घटनेमुळे खडवली ते कसारा मार्गावर प्रवासी ताटकळले होते.

अर्धा तास झाला तरी तो बिघाड दुरुस्त झाला नव्हता, त्यामुळे त्या मागून येणाऱ्या दोन लोकल प्रभावित झाल्या होत्या. भर दुपारी उन्हात ही घटना घडल्याने लोकल आणि एक्स्प्रेसमधील प्रवासी हैराण झाले होते. 

त्या मार्गावर सातत्याने लांबपल्याच्या गाड्यांमध्ये समस्या निर्माण होते, त्यामुळे ती न होण्यासाठी उपाययोजना करण्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याची टीका कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे शैलेश राऊत यांनी।केली. त्या बिघाडाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतो, आणि वेळापत्रक सपशेल कोलमडून पडते. त्यात अनेकांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले जाते.
;--------;

Web Title: Dombivali: Engine failure of Janshatabdi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.