सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप

By अनिकेत घमंडी | Updated: November 30, 2023 13:38 IST2023-11-30T13:36:21+5:302023-11-30T13:38:08+5:30

अडीचशे ज्येष्ठ नागरिकांना मिळाला याचा फायदा

Distribution of free life certificates to senior citizens by the Public Ganeshotsav Mandal | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप

अनिकेत घमंडी, डोंबिवली: सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली २-३ वर्षे डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यावश्यक असणारे जीवन प्रमाणपत्र विनामूल्य काढून देण्याकरीता शिबीर भरवते आहे.

यंदाही  २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर अशाप्रकारे दोन सत्रांमध्ये हे शिबीर राबविण्यात आले. डोंबिवलीतील सुमारे २५० ते २६० ज्येष्ठ नागरिकांना ॲानलाईन जीवन प्रमाणपत्र मंडळातर्फे विनामूल्य काढून देण्यात आले. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुशील भावे आणि  माधव मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी केला. शिबीरासोबतच डोंबिवलीजवळील ४ ते ५ वृद्धाश्रमांमध्ये जाऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांचेदेखील विनामूल्य प्रमाणपत्र मंडळातर्फे काढून देण्यात आले.

या उपक्रमामूळे ज्येष्ठ नागरिकांची बॅंकांमध्ये तासन् तास उभं राहून होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणावर टळते. तसेच मंडळांस आणि सहभागी कार्यकर्त्यांस मिळणारे या ज्येष्ठांचे शुभाशिर्वाद हे कोणत्याही आर्थिक देणगीपेक्षा अधिक मोलाचे आहेत आणि म्हणूनच मंडळ हा उपक्रम यपुढेही सुरू ठेवणार असल्याचे भावे यांनी सांगितले.

Web Title: Distribution of free life certificates to senior citizens by the Public Ganeshotsav Mandal