धुळे सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इजिनात वासींदमध्ये बिघाड
By अनिकेत घमंडी | Updated: December 4, 2023 17:19 IST2023-12-04T17:17:58+5:302023-12-04T17:19:14+5:30
दोन तास कसारा वासींद अप वाहतूक ठप्प.

धुळे सीएसएमटी एक्स्प्रेसच्या इजिनात वासींदमध्ये बिघाड
डोंबिवली:धुळे येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांबपल्याच्या गाडीचे इंजिन फेल झल्याची घटना वसिंद रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी १२ वाजून ८ मिनीटानी घडली. त्या घटनेमुळे कसारा ते वासींद अप मार्गावरची रेल्वे वाहतूक बंद पडली होती. डाऊन दिशेकडील वाहतूक सुरू होती, मात्र अप बंद असल्याने एक कसारा लोकल आणि एक मुंबईकडे येणारी लांबपल्याची गाडी इगतपुरी कसारा सेक्शनमध्ये अडकली होती.
अखेर दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी एका दुसऱ्या इंजिनाच्या सहाय्याने अडकलेली गाडी कल्याण दिशेने पुढे नेण्यात आली, त्यानंतर हळुहळु कसारा टिटवाळा मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली. दीड तासामुळे मध्य रेल्वेचे त्या भागातील वेळापत्रक संध्याकाळपर्यन्त कोलमडमले होते.