शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘केडीएमसी’तून १८ गावे वगळण्याचा निर्णय अवैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 05:20 IST

सरकारची अधिसूचना हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतून १८ गावे वगळण्यासंदर्भात राज्य सरकारने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची संमती घेतली नाही. सरकारने नियमाचे व कायदेशीर प्रक्रियेचा भंग केला, असे म्हणत उच्च न्यायालयाने केडीएमसीच्या हद्दीतील १८ गावे वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय अवैध ठरवला, तसेच १८ गावांची प्रस्तावित नगरपरिषद स्थापण्याची प्राथमिक अधिसूचनाही रद्द केली.राज्य सरकारने केडीएमसीच्या हद्दीतून २७ पैकी ९ गावे पालिकेतच ठेवली व १८ गावे पालिकेतून वगळली. २४ जून, २०२० रोजी त्याबाबत अंतिम अधिसूचना काढली. त्याच दिवशी राज्य सरकारने उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापण्याबाबत प्राथमिक अधिसूचना काढली.या दोन्ही अधिसूचनांना संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी ॲड.डी. एस. म्हैसपूरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, कायद्याप्रमाणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांना नगरपरिषदेत समाविष्ट करता येत नाही, तसेच केंद्र सरकारच्या जनगणनेनुसार या गावांतील लोकांची गणती महापालिकेत झाली आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याला पालिकेची संमती आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.त्यावर सरकारी वकील  बी. सावंत यांनी पालिकेची संमती असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, तसा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला नसल्याची बाब न्यायालयाने सरकारच्या निदर्शनास आणली.२०१५ ते २०२० पर्यंत गावे वगळण्याची प्रक्रिया खोळंबली होती. त्याबाबत पालिकेने आक्षेप घेतला नाही. त्यानंतर राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केल्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी ९ गावे पालिकेत ठेवण्याची व १८ गावे वगळण्याची शिफारस सरकारला केली. ही एक प्रकारची मंजुरीच आहे. सर्वसाधारण सभा आणि आयुक्त यांचा निर्णय वेगळा नाही, असा युक्तिवाद सावंत यांनी केला. त्यावर न्यायालयाने सरकारने सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता १८ गावांना या महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा घेतलेला निर्णय हा निव्वळ अवैधच असल्याचे म्हटले. सरकारने कायदेशीर  प्रक्रियेचा भंग केला आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना रद्द केल्या.२७ गावांचा २०१५ पासूनचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीतून २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव २०१५ पासून सरकार दप्तरी धूळखात होता. राज्य सरकारने या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेवर जनसुनावणी घेण्यात आली नव्हती.   त्यानंतर, ठाकरे सरकारने मार्च, २०२० मध्ये २७ गावे वगळण्यासंदर्भात अर्धवट राहिलेली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत २४ जून, २०२० रोजी केडीएमसीच्या हद्दीतून २७ पैकी ९ गावे पालिकेतच ठेवली व १८ गावे पालिकेतून वगळली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट