शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : धक्कादायक! केडीएमसीच्या कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहातच कचरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 18:58 IST

KDMC Covid Center : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याच कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहात कचऱ्याच्या पिशव्या ठेवल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे.

मयुरी चव्हाण 

डोंबिवली  - कल्याण पश्चिमेकडील वाडेघर डम्पिंग ग्राऊंड केडीएमसी प्रशासनाने बंद केलं. मात्र दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग अजूनही दिसून येत आहेत. इतकंच नाही तर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याच कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहात कचऱ्याच्या पिशव्या ठेवल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. येथील चित्र नजरेस पडल्यावर नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणारी पालिका प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे धडे द्यायला विसरली की काय? असा सवाल तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील लोकमतच्या हाती लागला आहे.  

डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे पालिकेचे कोविड सेंटर आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने काही कोविड सेंटर बंद करण्यात आली असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे कोविड सेंटर आजही सुरू आहे. येथील स्वच्छतागृह पाहून सुरुवातीला तुम्हाला प्रश्न पडेल की ही परिस्थिती नेमकी कुठली आहे? मात्र हे चित्र आपल्याच डोंबिवलीतील आपल्याच पालिकेतील कोविड सेंटरमधील आहे. येथील स्वच्छतागृहात चक्क कचऱ्याच्या बॅगा ठेवण्यात आल्यात. इतकंच नाही तर  स्वच्छतागृहाची अवस्था इतकी भयंकर आहे की याची कधी साफसफाई होते की नाही? हाच प्रश्न आहे. कोरोनां काळात वैयक्तिक स्वच्छतेवर देखील भर देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय. कोरोनाची लागण झाली की रुग्ण काहीसा खचलेला असतो. अशात आजूबाजूचे वातावरण प्रसन्न आणि परिसर स्वच्छ  ठेवणे आवश्यक आहे. मात्र सावळाराम क्रीडासंकुलातील स्वच्छतागृहाची अवस्था पाहून आम्ही इथून कधी एकदाच जातो असे येथील काही रुग्णांनी खासगीत लोकमतशी बोलताना सांगितलं. 

सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची चर्चा राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. याच कारण म्हणजे कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी, भारत सरकारतर्फे "वाराणसी आणि कल्याण डोंबिवली " शहराला सन्मानित करण्यात आलं आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. तर दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील डम्पिंग ग्राऊंड सुद्धा बंद झालाय. डम्पिंग बंद झालं असलं तरी शहरातील स्वच्छतेवर भर देणही आवश्यक झाल आहे. सर्वात आधी प्रशासनानं आपली कार्यालय... आरोग्य केंद्र, व रुग्णालय यांची देखील स्वच्छता योग्य प्रकारे होते की नाही हे देखील तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण