शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

CoronaVirus News : KDMC चा भोंगळ कारभार! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला गर्दीतून वाट काढत गाठावं लागतंय हॉस्पिटल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 14:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर त्याला मोकळे सोडले जात असल्याचं धक्कादायक चित्र आज कल्याणमध्ये  दिसून आलं आहे. 

कल्याण-डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून पालिका प्रशासनानेही टेस्टिंग करण्यावर भर वाढवला आहे. मात्र असे असले तरी अँटीजन टेस्ट केंद्रावर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर त्याला मोकळे सोडले जात असल्याचं धक्कादायक चित्र आज कल्याणमध्ये  दिसून आलं आहे. 

केडीएमसीकडून दररोज सुमारे 4500 नागरिकांची तपासणी केली जात असून रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड परिसरात देखील परगावाहून आलेल्या प्रवाशांची अन्टीजेन टेस्ट केली जाते. मात्र या तपासणीत एखाद्या नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसून उलट त्याला जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पॉझिटिव्ह अहवाल हातात घेऊन  गर्दीतून वाट काढत रुग्णाला हॉस्पिटल गाठावे लागत असल्याचे भयानक वास्तव समोर आलं आहे. दरम्यान याबाबत अन्टीजेन टेस्ट सेंटरवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल याबाबत सूचना दिल्या असून तत्काळ अमलबजावणी सुरू होईल असं पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा वाढता कहर! मुंबई लोकलची सेवा पुन्हा खंडीत होणार? मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात...

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईलोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई लोकलबाबतविजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. मुंबई लोकल बंद होणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. गर्दी कशी कमी होईल यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील. लोकल प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील असं देखील म्हटलं आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत सध्याच्या घडीला राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ सक्रीय रुग्ण आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठका सुरू आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMaharashtraमहाराष्ट्र