Corona's black night is over; Kalyan- Vaccination started in Dombivali | कोरोनाची काळी रात्र संपली; कल्याण- डोंबिवलीत लसीकरणास सुरवात

कोरोनाची काळी रात्र संपली; कल्याण- डोंबिवलीत लसीकरणास सुरवात

कल्याणकल्याणडोंबिवली महापालिकेच्या कोरोना लसीकणाच्या कार्यक्रमास आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात करण्यात आली. पहिली लस महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी घेतली. लस टोचून घेतल्यावर पाटील यांनी ‘कोरोनाची काळ रात्र संपली ’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मार्चपासून कोरोनाचा प्रादूर्भाव महापालिका हद्दीत सुरु झाला. कोरोनाचा कल्याण डोंबिवली हा हॉटस्पॉट होता. आज कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच महापालिका हद्दीत गेल्या पंधरा दिवसात  कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोना लसीचे सहा हजार डोस महापलिकेस उपलब्ध झाले आहेत. महापालिकेने लस देण्यासाठी चार ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यापैकी रुक्मीणीबाई रुग्णालयात आयुक्तांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

डॉ. अश्वीनी पाटील यांनी सांगितले की, लसीकरणासाठी सर्व व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. नागरीकांमध्ये लसीच्या साईड इफेक्टविषयी भिती आहे. ती भिती दूर करण्यासाठी मी स्वत: प्रथम लस घेतली आहे. ही लस सुरक्षीत आणि चांगली आहे. लस घेतल्यानंतर अर्धा तास लस घेणा:यासाठी निरीक्षण कक्षात ठेवले जाणारआहे. त्याठीकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले की, लसीकरणास सुरुवात होत आहे. तो आमच्या सगळ्य़ांसाठी आनंदाचा दिवस आहे. डॉक्टर व नर्स स्वत: लस घेऊन नागरीकांमध्ये लसीकरणाविषयी विश्वास निर्माण करीत आहेत. कोरानाच्या लढय़ात बोगद्यापलिकडे अंधार होता. आत्ता लस आल्याने प्रकाश दिसला आहे.

इंडियन मेडिलक असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले की, सामान्यांकडून  लसीच्या साईड इफेक्टविषयी रोज विचारणा केली जात होती. त्यांच्या मनातील लसीविषयीची भिती घालविण्यासाठी मी लस घेतली आहे.रुक्मीणीबाई रुग्णालयातील डॉ. प्रज्ञा टिके यांनी सुद्धा लस घेतली आहे. टिके यांनी सांगितले की, त्यांचे पती डॉ. पुरुषोत्तम टिके हे रुग्णालय अधिक्षक आहे. मुलगा डॉ. पार्थ टिके हा नायर रुग्णालयात इंटर्नशीप करतो. कोरोना काळात आम्ही सेवा दिली. आम्हाला कोरोना झाला नाही. तरी लस घेतली आहे.

रुक्मीणीबाई रुग्णालयातली अपघात विभागात कार्यरत असलेले वॉडर्बाय वसंत कुलकर्णी यांना ऑगस्ट महिन्यात कोरोनाची लागण झालीहोती. १२ दिवसांच्या उपचारापश्चात ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांनी आज कोरोनाची लस घेतली. आत्ता निर्धास्त झाल्यासारखे वाटत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी यांच्याप्रमाणोच वॉडबॉय असलेले प्रविण शिंदे यांना देखील कोरानाची लागण जुलै महिन्यात झाली होती. उपचार घेऊन ते बरे झाले. त्यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोना लसीचा डोस देणा:या परिचारिका प्रियंका गोडसे या लस घेणा:या प्रत्येकास लस घेतल्यास काही त्रस झाल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. लस घेतल्यावरही मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करायचे आहे. २८ दिवसानंतर दुस:या डोसकरीता तुमच्या मोबाईलवर मेसेजे येईल. त्यानंतर दुस:या डोस घेण्यासाठी यायचे आहे.

रुक्मीणीबाई रुग्णालयातील दुस:या मजल्यावर लसीकरण कक्षात लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कोरोना लसीकरणाची रांगोळी काढण्यात आली होती. त्याचबरोबर लसीकरण कक्षासमोरही पहिला व दुसरा डोस कोरोनाला दिला जात आहे अशा आशयाची रांगोळी काढण्यात आली होती.

सोशल डिस्टसींगचे पालक करण्यासाठी प्रत्येक खुर्चीत अंतर ठेवण्यात आले होते. नर्स, आशा वर्कस यांनी लस घेण्यासाठी रांग लावली होती. लसीकरणाविषयी  प्रचंड उत्सूकता होती. आज ती उत्सूकता शिगेला पोहचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत शुभारंभ होताच ते लॅपटॉवरील ऑलनाईन चॅनलेद्वारे कर्मचा:यांनी पाहून लसीकरणाचा शुभारंभ आयुक्तांच्या हस्ते केला. लस दिल्यावर सर्व कर्मचारी टाळ्य़ा वाजवून लस घेणा:याचे कौतूक करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Web Title: Corona's black night is over; Kalyan- Vaccination started in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.