शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिजाब वादावरुन काँग्रेसचं आंदोलन, महिलांच्या दोन गटांत झाली 'झटापट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 13:03 IST

कर्नाटकात हिजाबवरुन सुरु असलेल्या वादंग देशभरात पसरला आहे.

कल्याण - हिजाबच्या समर्थनात कल्याणमध्येकाँग्रेस महिला आघाडीकडून आज शिवाजी चौकातील आंदोलनास गालबोट लागले, हे आंदोलन हिजाबसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप करत काही महिलांनी वाद घातला. यावेळी महिलांच्या दोन गटात झटापट झाली. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी काही महिला पाठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला आहे.

कर्नाटकात हिजाबवरुन सुरु असलेल्या वादंग देशभरात पसरला आहे. अनेक ठिकाणी हिजाबच्या समर्थनात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. या पाश्वभूमीवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून हिजाबच्या समर्थनासाठी छत्रपती शिवाजी चौक परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाकरीता काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. आंदोलन सुरु झाले. त्याचवेळी गझल मांडेकर नावाच्या एका महिलेने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद घातला. 

गझल मांडेकर यांचे म्हणण आहे की, हिजाब आमचा हक्क आहे. तो हिरावून घेऊन शकत नाही. मात्र, काँग्रेस राजकारण करीत आहे. त्यानंतर येथील काँग्रेस कार्यकर्त्या आणि गझल सोबत असलेल्या काही महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काही महिलांचा विरेाध पाहता काँग्रेस कसेबसे हे आंदोलन उरकले. दरम्यान, याबाबत कांचन कुलकर्णी यांचे म्हणणे आहे की, आमचे आंदोलन शांत पद्धतीने सुरु होते. आमचे आंदोलन उधळून लावण्यासाठी महिला पाठविण्यात आल्या. या महिलांना कोणी पाठविले हे आम्हाला माहिती नाही. याची आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटकkalyanकल्याण