शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या माजी आमदाराकडून भाजपच्या मंत्र्यांना शुभेच्छा!बॅनरमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 23:00 IST

ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे. मात्र  कल्याण शीळ रोडवरील एका बॅनरने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण शिवसेनेचे माजी आमदार आणि त्यांच्या पुत्राकडून कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कल्याण- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका  निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या आहेत. तशा अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे डोंबिवलीत मनसेच्या मध्यवर्ती शहर शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत  डोंबिवलीच्या भाजाप आमदारांनी शुभेच्छा दिल्या. यामुळे मनसे भाजपाच्या युती बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित  केंद्रीय  पंचायत  राज राज्यमंत्री  कपिल पाटील यांच्यावर शुभेच्छाचा  वर्षाव होतोय. पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा सोमवारी काढली जाणार आहे. प्रथमच आगरी समाजाला केंद्रात मंत्री पद मिळाल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे. मात्र  कल्याण शीळ रोडवरील एका बॅनरने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण शिवसेनेचे माजी आमदार आणि त्यांच्या पुत्राकडून कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी  उमेदवारी डावलली गेल्यानं नाराज असलेले शिवसेनेचे माजी  आमदार सुभाष भोइर हे येणा-या काळात हातात कमळ घेतात का? ते पाहावं लागेलं. 

2019 सालच्या विधानसभा निवडणूकीत कल्याण ग्रामिण विधानसभेतून ऐनवेळी  सुभाष भोईर यांना तिकीट नाकारले गेले. त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्या गेल्याने सेनेत दोन गट निर्माण झाले होते. त्यामुळे सुभाष भोईर यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे  भोइर यांनी लावलेला बॅनर हा शुभेच्छा देण्यासाठी आहे, की काही राजकीय संकेत आहे? ते येणाऱ्या काळात पाहावे लागेल.  

टॅग्स :kalyanकल्याणKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण