शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शहरांतील तलावांची स्वच्छता उत्सव काळापुरतीच मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:01 AM

डोंबिवलीत जलपर्णीचा विळखा : कल्याणमध्ये कचऱ्याचे ढीग

कल्याण : गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीच्या वतीने हद्दीतील सर्वच तलावांची स्वच्छता केली जाते; पण उत्सव संपताच या तलावांकडे दुर्लक्ष केले जाते. हे वास्तव डोंबिवलीतील खंबाळपाडा असो अथवा कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी तलावाची अवस्था पाहता समोर येते. खंबाळपाडा तलावाला जलपर्णीचा विळखा पडला आहे, तर बंदिस्त लोखंडी गेट आणि जाळीचे कम्पाउंड बांधूनही विठ्ठलवाडी तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

महापालिकेच्या हद्दीत ४२ तलाव आहेत. वाढत्या नागरीकरणात पाणीपुरवठ्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध होऊ लागले, तसतसा तलावांचा वापर नागरिकांकडून कमी होऊ लागला. तलावांचा वापर कमी झाल्याने हे तलाव गाळ, मातीने भरून गेले आहेत. झुडपांची तसेच जलपर्णीची वाढ झाल्याने हे तलाव आहेत की माळरान अशी काही तलावांची अवस्था झाली आहे. कल्याण पश्चिमेतील काळा तलाव असो अथवा टिटवाळ्यातील गणपती मंदिर तलाव हे याबाबतीत अपवाद आहेत. अन्य तलावांच्या बाबतीत मात्र प्लास्टिक पिशव्या, कचरा, पूजेचे साहित्य टाकण्याचे एकमात्र ठिकाण म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान, तलावांची स्वच्छता उत्सव काळापुरतीच मर्यादित राहते आणि उत्सव संपताच तलावांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. खंबाळपाडा तलावाची सद्य:स्थिती पाहता याची प्रचिती येते. या तलावाला जलपर्णीचा विळखा पडला आहे. काही प्रमाणात निर्माल्याचा कचराही तलावात दिसून येतो.

लोखंडी गेट उभारूनही दुरवस्था कायमकल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी तलावाची अवस्थादेखील फारशी चांगली नाही. या तलावात सर्रासपणे निर्माल्यासह अन्य कचरा नागरिकांकडून टाकला जात होता. परंतु आता याला लोखंडी गेट लावून कुलूप लावण्यात आले आहे. तलावाभोवती लोखंडी जाळ्यांचे कम्पाउंडही टाकण्यात आले आहे. परंतु सद्य:स्थितीला तलावाच्या पाण्यात कचरा दिसत नसला तरी तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.  

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली