शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"BJP आमदारांची नार्को टेस्ट नव्हे, तर सायको टेस्ट करा"; शिवसेना-भाजपमध्ये शिमगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 06:58 IST

‘आम्हाला गुंड म्हणणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे’ 

कल्याण - कल्याणमध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपमध्ये गणेशोत्सवात पुन्हा शिमगा सुरू झाला आहे. धनुष्यबाणावर टीका करू नका. आम्हाला गुंड म्हणणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहे, असे म्हणत शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर टीका केली. घरोघरी गणरायाचे आगमन होत असताना दाेन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

भाजपच्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला महेश गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कुठे अन्याय होत असेल तर षंढ होण्यापेक्षा गुंड व्हा. आम्हाला गुंड म्हणविणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या दोन मुलांना पोलिस संरक्षण आहे, भाजप आमदारांची नार्को टेस्ट नव्हे, तर सायको टेस्ट करा, अशी टीका शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर केली. 

महेश गायकवाड काही कागद घेऊन येतात. तो पुरावा होत नाही. त्यांची ही बडबड केवळ बातम्यांमध्ये राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांची टीका म्हणजे ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ असाच प्रकार आहे, अशी  टीका भाजप पदाधिकारी संदीप तांबे यांनी केली. 

शिवसेना शहरप्रमुख गायकवाड यांनी दिलेल्या प्रत्युत्तराला तांबे म्हणाले, विनापुरावे आरोप करायचे. चार कागद दाखविले म्हणजे पुरावे होत नाही. ज्या कामाविषयी ते आरोप  करीत आहेत. ते काम तिसगाव येथे नाही. माजी नगरसेवक गायकवाड यांना ते काम नक्की कुठे आहे हेच माहिती नाही.  उगाच बडबड करून बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका तांबे यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना