शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election: उल्हासनगरात भाजप, शिंदेसेनेत राडा; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 07:29 IST

पैसे वाटपाच्या आरोपावरून वाद

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीसाठी सकाळी शांततेत मतदान सुरू होते. मात्र, दुपारी भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने गालबोट लागले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण असून, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला.

उल्हासनगर गोलमैदान परिसरातील खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे संपर्कप्रमुख अरुण तांबे हे पैशांचे वाटप करत आहेत, याची माहिती आ. कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी तसेच मुलगी यांना मिळाल्यावर त्यांनी थेट खासदार कार्यालयावर धडक दिली. कार्यालयातून पैसे वाटप का सुरू आहे? असा सवाल करत त्यांनी जाब विचारला, ज्याचे रूपांतर तू तू मैं मैं व धक्काबुक्कीत झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तांबे यांना ताब्यात घेतले. मात्र, ठोस तक्रार नसल्याने प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

शहरातील विविध प्रभागांत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. प्रभाग १६ मध्ये ज्योती चैनानी यांच्या पतीला पैसे वाटप केल्याच्या संशयावरून हिललाइन पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मतदार यादीतील त्रुटीमुळे आ. बालाजी किणीकर व पालिका अधिकाऱ्यांत खडाजंगी झाली.

शहरातील शांतता राखण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. जिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तिथे पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण पडली असून आतापर्यंत तक्रार न आल्याने, कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, उल्हासनगर 

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Municipal Election marred by clashes; police use mild force.

Web Summary : Ulhasnagar municipal elections saw clashes between BJP and Shinde Sena. Police used mild force to disperse crowds after allegations of bribery surfaced. Arrests were made, but later released due to lack of formal complaints. Tensions remain high.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे