मध्य रेल्वेचे पावसाळ्यात गाड्या सलग आणि सुरक्षित चालवल्या जाव्यात यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
By अनिकेत घमंडी | Updated: June 24, 2024 19:16 IST2024-06-24T19:15:51+5:302024-06-24T19:16:03+5:30
मध्य रेल्वेने मे-जून-२०२४ दरम्यान १.५५ लाख घनमीटर गाळ काढला

मध्य रेल्वेचे पावसाळ्यात गाड्या सलग आणि सुरक्षित चालवल्या जाव्यात यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
डोंबिवली: मध्य रेल्वेने या पावसाळ्यात आपल्या उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांची सुरळीत आणि व्यत्ययमुक्त सेवा सुनिश्चित करण्यासाठी पावसाळ्याची तयारी तीव्र केली आहे.
गाड्या सुरळीत चालवण्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणजे रेल्वे रुळांवर स्वच्छता राखणे. रुळांवर टाकण्यात आलेला चिखल आणि कचरा केवळ रुळांनाच विस्कळीत करत नाही तर त्याखालून जाणारे नाले देखील तुंबतात, त्यामुळे पावसाळ्यात रुळांवर पाणी साचते. मुंबई विभाग चौवीस तास अथकपणे काम करत आहे जेणेकरून गाळ आणि कचरामुक्त ट्रॅक योग्य प्रकारे असतील.
मध्य रेल्वे टीमने मे ते जून-२०२४ (आतापर्यंत) १.५५ लाख घनमीटर सांडपाणी/कचरा साफ केला आहे, तर मे ते जून-२०२३ या कालावधीत १.३० लाख घनमीटर सांडपाणी/कचरा साफ केला आहे.
पोकलेन (२१०,११०) माऊंट केलेल्या डीबीकेएम आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे आणि गोळा करण्याचे काम केले जात आहे. गाळ काढण्याचे काम केले जात आहे. रेल्वे जनतेला कचरा करू नका किंवा रुळांवर कचरा टाकू नका, असे आवाहन करत असताना, तो कचरा स्वच्छ करण्यासाठी केलेले विविध प्रयत्न हे स्वच्छ वातावरण देण्यासाठी मध्य रेल्वेच्या सततच्या प्रयत्नांचे उदाहरण असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.