जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा

By अनिकेत घमंडी | Published: June 24, 2024 04:44 PM2024-06-24T16:44:46+5:302024-06-24T16:45:56+5:30

प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख हे उपस्थित होते.

Celebration of Kalidas Day on behalf of Senior Citizen Sangh Subhash Maidan Kalyan | जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा

जेष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याणच्या वतीने कालिदास दिन साजरा

डोंबिवली: जेष्ठ नागरिक संघ कल्याणच्या वतीने सुभाष मैदान येथील जेष्ठ भवन येथे कालिदास दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख हे उपस्थित होते.

देशमुख यांनी महाकवी कालिदास यांचे गोष्टीरूप जीवन चरित्र सांगत सांगत कालीदासांनी लिहिलेल्या ऋतुसंहार, शाकुंतल, विक्रमोर्वशीयम्, मेघदूत, रघुवंश व इतर साहित्याचा व त्यातील सौंदर्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. देशमुख यांचा सत्कार करतांना कवी शिरीष मोराणकर यांनी प्रवीण देशमुख यांच्या सामाजिक व साहित्यिक कामगिरीवर नितांत सुंदर रचलेली कविता ती फ्रेम करून शाल श्रीफळा समवेत देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष यशवंत कोसुळकर हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता मोराणकर यांनी केले.

Web Title: Celebration of Kalidas Day on behalf of Senior Citizen Sangh Subhash Maidan Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.