अनधिकृत बांधकाम प्रकरणी बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल
By मुरलीधर भवार | Updated: January 29, 2025 19:04 IST2025-01-29T19:04:28+5:302025-01-29T19:04:51+5:30
अन्सारी चौकात जे. एम. व्हीला ही नऊ मजली इमारत बांधण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल
मुरलीधर भवार, कल्याण-शहराच्या पश्चिम भागतील अन्सारी चौकात जे.एम. व्हीला या इमारतीत वाढीव बांधकाम करण्याची परवानगी घेतली नाही. तसेच इमारतीच्या शेजारीच जमजम बंगल्याचेही अनधिकृत बांधकाम केले. ही दोन्ही बांधकामे कल्याण डोंबिवली महापालिकेने अनधिकृत असल्याची घोषित केली आहे. या प्रकरणी बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्सारी चौकात जे. एम. व्हीला ही नऊ मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत २० सदनिका आणि पाच वाणिज्य गाळे आहे. त्याच्याशेेजारी जमजम बंगल्याचे बांधकाम केले गेले आहे. बिल्डरने इमारतीचे वाढीव बांधकाम करण्याची महापालिकेच्यानगररचना विभागाकडून परवानगी घेतली नव्हती. तसेच इमारतीच्या शेजारी असलेल्या जमजम बंगल्याची बांधकाम परवानगी घेतली नाही. या प्रकरणी महापालिकेने बिल्डरला नोटिस बजावून या बांधकाम प्रकरणातील कागदपत्रे सादर करण्याचे आदेशीत केले होते. बिल्डराने इमारतीमधील वाढीव बांधकाम आणि बंगल्याच्या बांधकामाची परवानगी सादर केली नाही. महापालिकेने संबंधित बांधकामे अनधिकृत असल्याचे घोषित केले. संबंधित बांधकामे बिल्डरने स्वखर्चातून तोडून घेण्याची नाेटिस महापालिकने बिल्डरला बजावली. त्यालाही बिल्डरने प्रतिसाद दिला नाही. अखेरीस महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयाचे अधीक्षक उमेश यमकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बाजारपेठ पोलिस ठाण्यात बिल्डरच्या एमआरटीपी अ’क्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले की, संबंधितल बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी अ’क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची मदत घेऊन इमारत पाडकामाची पुढील कारवाई केली जाईल.
बिल्डर डोलारे याने अशा प्रकारे यूसूफ हाईटस या इमारतीचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर डोलारे हा पसार झाला आहे. त्यामुळे डोलारे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.