कल्याण ग्रामीणमध्ये 'ब्रेक द चेन'चे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:40 IST2021-05-07T23:39:49+5:302021-05-07T23:40:04+5:30

महानगरपालिका क्षेत्र वगळता ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे ,दुधडेअरी, मिठाई व इतर अन्न पदार्थ विक्रीचे दुकानं सोमवार ( 10 मे) सकाळी 7 वाजेपासून शुक्रवारी ( 15 मे)  सकाळी 7 वाजेपर्यंत  घरपोच सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे

Break the chain orders in Kalyan Grameen | कल्याण ग्रामीणमध्ये 'ब्रेक द चेन'चे आदेश 

कल्याण ग्रामीणमध्ये 'ब्रेक द चेन'चे आदेश 

कल्याण - कल्याण  ग्रामीण परिसरात कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ब्रेक द चेन  अंतर्गत  नवीन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे  ग्रामीण भागात काही दिवस कडक लॉकडाऊन असणार हे  निश्चित झाले आहे.10 मे पासून ते 15 मे पर्यंत हे नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. या वृत्तास कल्याणचे तहसीलदार  दीपक आकडे यांनीही दुजोरा दिला आहे. 

महानगरपालिका क्षेत्र वगळता ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, बेकरी, फळे ,दुधडेअरी, मिठाई व इतर अन्न पदार्थ विक्रीचे दुकानं सोमवार ( 10 मे) सकाळी 7 वाजेपासून शुक्रवारी ( 15 मे)  सकाळी 7 वाजेपर्यंत  घरपोच सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही अनेक नागरिक मोठ्या संख्येने बाधित झाले आहेत. त्यामुळे  नवीन आदेशाला ग्रामीण परिसरातील नागरिक कशाप्रकारे  सहकार्य करतात ते पाहावे लागेल. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात येत्या 10 मे पासून 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचा  प्रस्ताव   तहसीलदार आकडे   यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करून  जिल्ह्याधिका-यांनी ब्रेक द चेनचे  नवीन आदेश पारित केले.

Web Title: Break the chain orders in Kalyan Grameen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.