महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
By अनिकेत घमंडी | Updated: December 6, 2023 16:27 IST2023-12-06T16:25:32+5:302023-12-06T16:27:12+5:30
सामाजिक बांधिलकीतून महावितरणच्या अंबरनाथ उपविभागाने हा उपक्रम राबवला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
डोंबिवली: महावितरणच्याउल्हासनगर विभाग दोन अंतर्गत अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागाकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान शिबिरात ६७ अधिकारी, अभियंते व जनमित्रांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीतून महावितरणच्या अंबरनाथ उपविभागाने हा उपक्रम राबवला.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अंबरनाथ तहसिल कार्यालयाशेजारील महावितरणच्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागीय कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्यासह ६७ अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. तर १०२ जणांची आरोग्य तपासणी या शिबिरात करण्यात आली.
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनुक्रमे जितेंद्र प्रजापती व अलका कावळे, संघटना प्रतिनिधी, अभियंते, जनमित्र यांच्या पुढाकारातून आणि साई सिटी हॉस्पिटलच्या सहकार्यातून रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यात आले.