शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या मदतीसाठी धावल्या भाजप पदाधिकारी, चर्चेनंतर काढला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:20 IST

Kalyan News : कल्याण पश्चिमेत राहणारी एक महिला दोन मुली आणि मुलासह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. तिने तिचे सामान घराबाहेर दारात मांडून ठेवले आहे.

कल्याण : कौटुंबिक वादातून एक विवाहित महिला तिच्या तीन मुलांसह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. याबाबतची माहिती भाजप कल्याण शहर जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी आणि कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात यश मिळवले.कल्याण पश्चिमेत राहणारी एक महिला दोन मुली आणि मुलासह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. तिने तिचे सामान घराबाहेर दारात मांडून ठेवले आहे. ‘आपला पती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असून, त्याने तिला व मुलांना घराबाहेर काढले आहे,’ असा तिचा आरोप आहे. परंतु, मला पतीसोबत राहायचे आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, या महिलेची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांना मिळताच त्यांच्या सूचनेनुसार भाजपच्या महिला पदाधिकारी चौधरी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिच्या मदतीला धावल्या. महिला, तिचे सासरे आणि पोलीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर ती सासरच्यांसाेबत राहणार असल्याचे ठरले आहे, असे चौधरी म्हणाल्या.

‘आमच्या जीवाला धाेका’महिलेच्या सासऱ्यांनी सांगितले की, ‘माझी सून मला, सासूला व तिच्या पतीला जाणीवपूर्वक त्रास देते. आम्हाला मारते. त्यामुळे आमच्या जीवाला तिच्यापासून धोका आहे. म्हणून आम्ही तिला भाड्याचे घर घेऊन दिले आहे. मात्र, तिथे तिला राहायचे नाही.’

टॅग्स :FamilyपरिवारBJPभाजपा