डोंबिवली - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सारे काही बंद होते. सर्व धार्मिक स्थळे बंद होती धार्मिक स्थळे व मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने जोरदार मागणी केली होती. तसेच अनेक वेळा आंदोलनेही केली होती. सरकारने आज राज्यातील सर्व मंदिरे काही नियम पाळून सुरू करण्यात यावी असे आदेश दिल्याने, आज डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले तसेच मंदिराच्या बाहेर जल्लोष करत आनंद साजरा केला. इतकेच नव्हे तर मंदिराबाहेर भाजप आमदार रवींद्र चव्हाण माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करीत फेर धरला आणि आपला आनंद व्यक्त केला. मात्र यावेळी सोशल डिस्ट्रिक्ट उडाला होता महाविकास आघाडीच्या कॉमन प्रोग्राम मध्ये कदाचित हिंदू सणांवर पाबंदी आणावी अशी अट असेल मात्र ईश्वराने सद्बुद्धी दिली आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली आहे
डोंबिवलीतील गणेश मंदिरासमोर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी नृत्य करत धरला फेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 16:21 IST