शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन पक्ष फोडूनही भाजप पराभवाच्या छायेत; आमदार रोहित पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 07:42 IST

सत्तेसाठी ही फोडाफोडी करून देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे  आमदार रोहित पवार यांनी भाजपवर शुक्रवारी हल्ला केला

कल्याण : स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपने केलेल्या सर्वेक्षणात लोकसभा निवडणुकीत भाजपची परिस्थिती खराब असल्याचे दिसल्याने भाजप नेत्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही हे पाहून भाजपने शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. 

सत्तेसाठी ही फोडाफोडी करून देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे  आमदार रोहित पवार यांनी भाजपवर शुक्रवारी हल्ला केला. आपण राजकारणात विचार जपण्यासाठी आलो आहोत. नेता होण्यासाठी आलेलो नाही, असा टोलाही त्यांनी आपले काका अजित पवार यांना लगावला. कल्याण येथील स्प्रिंग टाइम हॉटेलच्या सभागृहात इंडिया आघाडीच्या सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या सभेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह पदाधिकारी वंडार पाटील, संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन बासरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, आम आदमीचे धनंजय जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार यांनी लोकलने गाठले कल्याणपवार यांनी वांद्रे येथून कल्याणच्या सभेला येण्यापूर्वी गुगलवर वाहतुकीची स्थिती जाणून घेतली. तेव्हा तीन तास लागणार असल्याचे दिसल्यावर आपण लोकलने कल्याणला येणे पसंत केले. कल्याणला आल्यावर एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्यासाठी ४५ मिनिटे लागली तर परत सभेच्या ठिकाणी पोहोचण्याकरीता अर्धा तास लागला, असेही ते म्हणाले.

कोंडीही लक्ष्यपवार म्हणाले की, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांचे चिरंजीव खासदार आहेत. या ठिकाणच्या जनतेशी गप्पा मारल्यावर कळले की या ठिकाणी विकास झालेला नाही. या भागात आराेग्याच्या, वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत. या सभेला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार होते. मात्र ते या सभेला आले नाहीत.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBJPभाजपा