उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ
By मुरलीधर भवार | Updated: March 16, 2024 14:56 IST2024-03-16T14:55:56+5:302024-03-16T14:56:15+5:30
२७ गावे आणि डोंबिवलीचा ऑक्सीजन झोन असलेल्या उंबार्ली टेकडीवर पक्षी अभय अरण्य विकसीत करण्याच्या कमाचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. या पक्षी अभय अरण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

उंबार्ली टेकडीवरील पक्षी अभय अरण्य विकसित करण्याचा शुभारंभ
डोंबिवली-२७ गावे आणि डोंबिवलीचा ऑक्सीजन झोन असलेल्या उंबार्ली टेकडीवर पक्षी अभय अरण्य विकसीत करण्याच्या कमाचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. या पक्षी अभय अरण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या प्रसंगी निसर्ग मित्र मंगेशकोयंडे, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश मोरे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, पदाधिकारीरवी पाटील,मुकेश पाटील, भास्कर पाटील, जालिंदर पाटील, बाल फोटोग्राफर आणि पक्षी अभ्यासक अर्णवपटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. उंबार्ली टेकडी ही डोंबिवलीचा श्वास आहे. लोकसहभागातून ही टेकडीवनश्रीने नटलेली आहे.
११३ विविध पक्ष्यांचे वास्तव्य टेकडीवर आहे. टेकडीवरील निसर्ग संपत्ती, फूल-झाडे, पक्षी सुरक्षित रहावे, तेथे पक्षी अभयअरण्य व्हावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली होती. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही या टेकडीचा विकास करुन त्याठिकाणी नेचर पार्क उभारले जावे अशी मागणी केली होती. पर्यावरण प्रेमी आणि मनसे आमदार पाटील यांच्या मागणीचा विचार करता.खासदार शिंदे यांच्या माध्यमातून या टेकडीवर पक्षी अभय अरण्य विकसित व्हावे अशी सरकारकडे करण्यात आली. सरकारने त्याला मान्यता दिली. निसर्ग प्रेमींच्या उपस्थितीत त्याचे काम आज सुरु करण्यात आले.