डोंबिवलीतील भोईर जिमखाना महाराष्ट्र ऑलिम्पिक २०२३ मध्ये चमकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2023 17:23 IST2023-01-12T17:23:38+5:302023-01-12T17:23:51+5:30
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.

डोंबिवलीतील भोईर जिमखाना महाराष्ट्र ऑलिम्पिक २०२३ मध्ये चमकला
डोंबिवली - 2 ते 12 जानेवारी या कालावधीत पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत भोईर जिमखाना यांनी बाजी मारली आहे. ठाणे जिल्ह्यातून स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करत सर्वोत्कृष्ट संघ म्हणून भोईर जिमखाना यांनी सुवर्णपदक जिंकले.
मनेश गाढवे, अथर्व टेमकर, वरद सावंत आणि मानस घोडेक, भोईर जिमखाना जिम्नॅस्ट आदर्श भोईर आणि आयुष मुळ्ये यांनी वैयक्तिक पुरुष ट्रॅम्पोलिनमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे राही पाखले आणि ब्रीड यांनी वैयक्तिक महिला ट्रॅम्पोलिनमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.