अवयवदान दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
By सचिन सागरे | Updated: August 3, 2023 17:55 IST2023-08-03T17:55:31+5:302023-08-03T17:55:31+5:30
विद्यार्थी व शिक्षकांनी अवयवदानाची जनजागृती करून अवयव दान करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब–हाटे यांनी केले.

अवयवदान दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
कल्याण - पूर्वेकडील साकेत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अवयव दान जनजागृती कार्यक्रम आज संपन्न झाला. अवयव दान दिनाचे औचित्य साधून फेडरेशन ऑफ ऑर्गन बोडी डोनेशनचे नागराज अय्यर यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी अवयवदान या विषयावर संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील अवयवदाना मागील अंधश्रद्धा दूर करत अवयवदानाचे महत्त्वही अय्यर यांनी विषद केले. तसेच मरणोत्तर आपल्या शरीरातीत अवयव दान केल्याने आठ जणांना त्याचा फायदा होतो आणि ५० पेक्षा जास्त लोकांना इतर प्रकारे त्याचा उपयोग होतो. त्यासाठी आपण स्वतःला सुदृढ कसे ठेवायचे, त्यासाठी योग्य आहार कसा घ्यावा हेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी व शिक्षकांनी अवयवदानाची जनजागृती करून अवयव दान करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब–हाटे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका हर्शिका दुबे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या व्यवस्थापन सदस्य हेमा तिवारी, उपप्राचार्य श्रीमती राणी रघुवंशी, प्रा .प्रिया नेरलेकर, प्रा. निलेश खुस्वाहा, संचीता पंडा व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी अवयवादानाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.