खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू
By प्रशांत माने | Updated: November 26, 2023 13:13 IST2023-11-26T13:12:17+5:302023-11-26T13:13:20+5:30
जळालेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटेना

खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू
डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील पत्रीपूलाजवळील रेल्वे पटरी लगतच्या झाडाझुडपामध्ये एका पुरूषाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत १६ नोव्हेंबरला आढळुन आला. रविवारी या घटनेला दहा दिवस उलटूनही अदयाप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे मृतदेहाचे गूढ कायम राहिले आहे. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार या घटनेत घडला आहे.
या घटनेप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलातरी डोंबिवली शहरातील चारही पोलिस ठाण्यांतील विशेष पोलिस पथके तसेच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस या गुन्हयाचा समांतर तपास करीत आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खुन करून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो जाळून टाकण्याचा प्रकार केला आहे. मृतदेहाचा कमरेपासून वरील भाग जळाल्याने तो विद्रुप झाला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान टिळकनगर पोलिसांनी मृतदेहाचे वर्णन जाहीर केले आहे.
वर्णन जुळत असल्यास पोलिस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मृतदेह पुरूष जातीचा असून वय अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील आहे. मृत व्यक्तीच्या वरच्या दातांना सिरॅमिक किंवा मेटेलची क्लीप लावलेली आहे. अंगावर राखाडी रंगाचा जळालेला शर्ट असून त्यावर लाल ठिपके आहेत. स्काय ब्ल्यू रंगाची जीन्स पॅन्ट असून कमरेला चामडी लोखंडी हुक असलेला पट्टा आहे. अशा वर्णनाची कोणत्याही पोलिस ठाण्यांमध्ये मिसिंग किंवा अपहरणाचा गुन्हा तसेच इतर तक्रार दाखल असल्यास त्वरीत टिळकनगर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन वरीष्ठ पोलिस निरिक्षक उमेश गित्ते यांनी इतर पोलिस ठाण्यांना