दहीहंडी समन्वय समिती सल्लागारपदी आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती
By प्रशांत माने | Updated: October 8, 2023 19:13 IST2023-10-08T19:13:01+5:302023-10-08T19:13:10+5:30
दहीहंडी हा नुसता एक उत्सव राहिला नसून त्याला एक साहसी खेळ म्हणून दर्जा मिळाला आहे.

दहीहंडी समन्वय समिती सल्लागारपदी आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती
कल्याण : दहीहंडी हा नुसता एक उत्सव राहिला नसून त्याला एक साहसी खेळ म्हणून दर्जा मिळाला आहे. लवकरात लवकर या खेळाला ऑलिंपिक्स स्तरावर नेण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती (महा) कार्यान्वयीत आहे. रविवारी दहीहंडी समन्वय समिती (महा) च्या सल्लागार पदी कल्याण पूर्व चे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यासह भिवंडी,उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड व शहापूर या तालुक्यांमध्ये स्वतंत्र दहीहंडी समितीची स्थापना करून त्या समित्यांना मुख्य समितीशी संलग्न करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, सचिव सुरेंद्र पांचाळ, गीता झगडे, कार्याध्यक्ष डेव्हिड फर्नांडिस, सदस्य राजेश सोणावडेकर, विनोद झगडे, विवेक नाक्ती, निरंजन आहिर व विजय साळावकर आदी मान्यवर उपस्थित होते. समितीने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली जवाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन असे आश्वासन आमदारांनी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांना दिले.