शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

KDMCचा मोठा निर्णय! परराज्यातून कल्याण स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 17:06 IST

परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविड टेस्ट न करताच शहरात दाखल होत आहेत. यामुळे आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविड टेस्ट न करताच शहरात दाखल होत आहेत. यामुळे आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर कल्याण स्टेशनवर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटिजेन टेस्ट  बंधनकारक करण्याचे निर्देश  केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. नागरिकांनी ॲन्टीजेन टेस्ट न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याचेही संकेत सूर्यवंशी यांनी दिलेत. महापालिका आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत  गुरुवारी कल्याण रेल्वे स्थानकात आयोजिलेल्या पाहणी दौऱ्याच्या वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली.              11 एप्रिल रोजी 2400 पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 200 पर्यंत आलेली आहे, आपण कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत पण परप्रांतातून विशेषतः युपी, बिहार, वेस्ट बंगाल येथे  गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वे प्रशासनासोबत पाहणी करून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन  करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकावर आता 3 ते 4 ठिकाणी टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामधून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग केले जाईल असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

त्याचप्रमाणे ब्रेक द चेनच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असून परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणा-या प्रवाश्यांकडे आरटीपीसीआर किंवा अँन्टीजेन टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करुनच त्यांना बाहेर सोडले जाईल, तसेच "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येकाने चाचणी करुन घेणे आवश्यकच आहे, असे रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी सांगीतले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण