रेरा प्रकरणातील आणखीन एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा
By मुरलीधर भवार | Updated: January 5, 2023 18:44 IST2023-01-05T18:43:54+5:302023-01-05T18:44:11+5:30
रेरा आणि केडीएमसीची फसवणू करुन बाेगस बांधकाम परवानगी मिळविलेल्या आणखीन एका बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे.

रेरा प्रकरणातील आणखीन एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा
कल्याण-रेरा आणि केडीएमसीची फसवणू करुन बाेगस बांधकाम परवानगी मिळविलेल्या आणखीन एका बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे.
विकासक सुनील जयसेकर याच्या डोंबिवली पूर्व खंबाळपाडा कांचनगाव येथील शतायू हॉस्पिटल जवळील आर.सी.सी. प्लींन्थ आणि बीमचे बांधकाम करण्यात आले हाेते.बनावट कागदपत्रानुसार अनुसया तुळशिराम चौधरी द्वारा वास्तुशिल्पकार मे.गोल्डन गायमेन्सन यांनी ही इमारत बांधलेली आहे. या बांधकामाची परवानगी बाेगस हाेती.
हे प्रकरण रेरा आणि महापालिका फसवणूक प्रकरणातील ६५ पैकी एक हाेते. या बेकायदा बांधकामावर सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कारवाई केली. टिळकनगर पाेलिस बंदाेबस्तात पाेकलेन, गॅस कटर, कामगारांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. कालच बाेगस बांधकाम परवानगी प्रकरणातील बेकायदा इमारतीवर डाेंबिवली पश्चिमेत कारवाई करण्यात आली हाेती.