शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् बुटांवरील रक्ताच्या डागाने बळावला संशय; अत्याचार, हत्या करणारा विशाल गवळी रात्रभर होता घरातच

By सचिन सागरे | Updated: December 30, 2024 12:56 IST

२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला.

सचिन सागरे -

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करणारा विशाल गवळी दुष्कृत्यानंतर रात्रभर घरातच होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि घराबाहेर असलेल्या बुटांवर पडलेल्या रक्ताच्या डागांमुळे त्याच्यावरील संशय बळावला आणि पोलिसांनी माग घेत शेगावला त्याला बेड्या ठोकल्या. 

२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची सहा पथके सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत होती.

ज्या परिसरात मुलगी राहत होती तेथील सीसीटीव्हीमध्ये ती परिसराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये शोध घेतला. यादरम्यान, एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. ज्या घराबाहेर हे बूट होते ते घर विशालचे असल्याचे समोर आले. 

नातेवाइकांकडे राहायला गेला घटनेच्या दिवशी रात्रभर पत्नीसोबत घरात असलेला विशाल दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे साक्षीला बँकेत सोडायला गेला. तेथून तो एका जवळच्या नातेवाइकांकडे दोन-तीन दिवस राहायला जाण्याच्या उद्देशाने निघून गेला. 

डोंबिवली-ठाणे आणि शेगाव- नातेवाइकांकडे गेलेल्या विशालला पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच त्याने तिथून पोबारा करत रिक्षाने डोंबिवली रेल्वे स्टेशन गाठले. - तेथून लोकलने ठाण्याच्या दिशेने गेला. संध्याकाळी ठाणे स्टेशनवरून एक्स्प्रेस पकडून शेगावला गेला. प्रवासादरम्यान तो प्रवाशांकडून मोबाइल घेत नातेवाइकांशी संपर्क करत होता. 

शेगावमध्ये लॉजवर थांबला शेगावला गेलेला विशाल पत्नी साक्षीच्या माहेरी न जाता लॉजवर थांबला. तेथूनही त्याने प्रकरणाची माहिती घेतली. विशाल लॉजवर थांबल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठांना विशालबाबत माहिती देत शेगाव पोलिसांना लॉजवर धडक देण्यास सांगितले.मात्र, तेथे विशाल आढळला नाही. त्यानंतर जवळील एका सलूनमध्ये दाढी करायला बसलेल्या विशालच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पती मारेल या भीतीने केले सहकार्य - घटनेच्या दिवशी, जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने विशालचे आई-वडील आणि भाऊ हे तिघे तिकडे गेले होते. तर पत्नी साक्षी कामाला गेली होती.- त्या दिवशी घरात एकटाच असल्याची संधी साधत विशाल पीडितेला फूस लावून घरी घेऊन गेला आणि हे दुष्कृत्य केले. पती मारेल या भीतीने साक्षीने त्याला सहकार्य केले आणि तिच्याच खुलाशामुळे हा प्रकार समोर आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस