शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वीकेण्डला पूर्णवेळ रेल्वे प्रवासाला परवानगी द्या, प्रवासी संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 23:58 IST

Mumbai Suburban Railway : एक फेब्रुवारीपासून मध्य रेल्वेने मुंबईच्या लोकलने सामान्य नागरिकांना प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व अन्य लोकल प्रवाशांनाही फारशा सोयीच्या नाहीत.

डोंबिवली -  एक फेब्रुवारीपासून मध्य रेल्वेने मुंबईच्या लोकलने सामान्य नागरिकांना प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व अन्य लोकल प्रवाशांनाही फारशा सोयीच्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी नागरिकांना पूर्णवेळ लोकल प्रवासाची सुविधा देण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.शनिवार व रविवारी बहुतांश निमसरकारी आणि खासगी कार्यालये बंद असतात. हे दोन दिवस म्हणजे, शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत लोकल सामान्यांनाउपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. व्यवस्थित नियोजन केल्यास सकाळी सीएसएमटीवरुन डाऊन दिशेला आणि सायंकाळी अप दिशेला सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देता येईल, असेही महासंघाने सूचवले आहे. लोकल सेवा पूर्ण खुली करण्यापूर्वी मुंबई महानगर क्षेत्रातील कार्यालयीन वेळा कोणत्याही परिस्थितीत बदलण्याची आग्रही विनंती महासंघाने केली आहे. 

सेवांपासून वंचित यासंदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले, लोकल पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने कसारा, कर्जत, खोपोली व पनवेल परिसरातील नागरिक मागील दहा महिन्यांहून अधिक काळ लोकलने मुंबईला जाऊ शकले नाहीत. रुग्णालयीन उपचार, महत्त्वाची कामे, नातेवाइकांच्या भेटी, खरेदी, पर्यटन या बाबींचा विचार केल्यास मुंबईपासून दूर असलेले लाखो नागरिक आजही वंचित आहेत.  सध्या दिलेला प्रवास वेळ अपुरा असल्याने दूरवर वास्तव्य करणारे नागरिक पूर्णवेळ लोकल प्रवासाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, कोरोनाचे निर्मूलन झाल्यशिवाय पूर्णवेळ लोकल प्रवासाची मुभा अशक्य असल्याची जाणीव महासंघाला असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक