चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष
By अनिकेत घमंडी | Updated: August 23, 2023 19:40 IST2023-08-23T19:39:59+5:302023-08-23T19:40:13+5:30
डोंबिवलीतही पूर्व, पश्चिम मंडळ भाजपच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद पेडणेकर यांनी त्याबद्दल जल्लोष केला.

चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष
डोंबिवली: चंद्रयान ३ मिशन भारतीय शास्त्रज्ञानी यशस्वी करून दाखवले त्याचा जल्लोष जगात होत असतानाच डोंबिवलीतही पूर्व, पश्चिम मंडळ भाजपच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद पेडणेकर यांनी त्याबद्दल जल्लोष केला. डोंबिवलीकर नागरिकांना पेढे भरवून त्यांनी हा आनंद व्यक्त केला. भाजपच्या वतीने शहरांतील नागरिकांना पेढे वाटले, कॉसमॉस बँकेच्या।परिसरात फटाके, ढोल वाजवून बुधवारी संध्याकाळी जल्लोष व्यक्त करण्यात आला. त्यावेळी पक्षाचे माजी नगरसेवक, पेडणेकर यांच्या म्हात्रेनगर प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पेडणेकर यांनी पदभार घेताच हा आनंदाचा क्षण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचा असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण आफ्रिकेत जो आनंद झाला असेल तेवढाच मलाही झाल्याचे ते म्हणाले. शहरात अन्यत्र सर्व ठिकाणी त्याबद्दल आनन्द व्यक्त करण्यात आला. डोंबिवलीकर नागरिकांनी समाज माध्यमांवर भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा लिहून चांद्रयान ३ च्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.