अनाधिकृत बांधकामांवर हातोडा; KDMC च्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 02:24 PM2021-10-23T14:24:06+5:302021-10-23T14:24:25+5:30

महापालिकेच्या डोंबिवली येथील फ प्रभागातील खंबाळपाडा शंकेश्वर लेक  व्हील इमारतीच्या बाजूला कारवाई

Action Against unauthorized constructions by KDMC, many scarred | अनाधिकृत बांधकामांवर हातोडा; KDMC च्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले

अनाधिकृत बांधकामांवर हातोडा; KDMC च्या धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले

Next

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. बेकायदा इमारती केडीएमसीच्या रडारवर असून  पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा मारला आहे.त्यामुळे  भूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले असून आगामी काळात पालिकेची भूमिका काय राहते ते देखील पाहावं लागणार आहे. 

महापालिकेच्या डोंबिवली येथील फ प्रभागातील खंबाळपाडा शंकेश्वर लेक  व्हील इमारतीच्या बाजूला भोईरवाडी येथील  प्रवीण शांताराम नाईक यांच्या  सुरू असलेल्या तळ  मजल्याच्या अनधिकृत आरसीसी इमारतीवर निष्कासनाची  धडक कारवाई  करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे खंबाळपाडा भोईरवाडी येथिल कच्च्या रस्त्याला लागून असलेले बांधकाम धारक  शरद मधुकर राहुल यांच्या तळ + 1 मजल्याच्या सुरू असलेल्या अनाधिकृत आरसीसी इमारतीवर  देखील निष्कासनाची कारवाई  करण्यात आली आहे.

ही कारवाई  पोलीस अधिकारी /कर्मचारी त्याच प्रमाणे 1 पोकलेन, 1 जेसीबी, 10 कामगार व फ प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीमधील आयरेगाव परिसरातील एका बेकायदा इमारतीवर देखील कारवाई करण्यात आली होती.

Web Title: Action Against unauthorized constructions by KDMC, many scarred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app