शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

Accident: हेडफोन शोधताना रेल्वेची धडक, एकाचा मृत्यू, तर दुसरा जखमी, कोपर-डोंबिवली स्थानकांदरम्यानची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:37 IST

Accident: लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करीत असताना हेडफोन पडल्याने दोन मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत हेडफोन शोधत असतानाच त्यांना रेल्वेची धडक बसली. त्यात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा १७ वर्षीय मित्र जखमी झाला.

डोंबिवली :  लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करीत असताना हेडफोन पडल्याने दोन मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत हेडफोन शोधत असतानाच त्यांना रेल्वेची धडक बसली. त्यात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा १७ वर्षीय मित्र जखमी झाला. यासंदर्भात मंगळवारी रात्री डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद  करण्यात आली आहे.  कोपर ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात घडला.लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदराजा हैदरअली शेख (१६) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, सादिक शेख (१७) असे जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. मुंब्रा येथील अहमदराजा, सादिक आणि दोघे असे चार मित्र मलंगगडला जाण्यासाठी कल्याणला गेले होते. तेथून परत येत असताना चौघे मुंब्रा येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढले. चौघेही रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते. लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर अहमदराजाचे हेडफोन रेल्वे रुळावर पडले. हेडफोन घेण्यासाठी  अहमदराजा व सादिक कोपर रेल्वे स्थानकात उतरले. त्यांचे अन्य दोन मित्र कोपरला न उतरता पुढे मुंब्रा रेल्वे स्थानकात गेले. 

लोकल न दिसल्याने होत्याचे नव्हते झाले     अहमदराजा आणि सादिक यांनी कोपर रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे रुळवरून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालत जाऊन हेडफोन शोधण्याचा प्रयत्न केला.     त्या नादात हे दोघे मित्र इतके गुंतले होते की त्यांना समोरून मुंबईच्या दिशेने येणारी अंबरनाथ लोकल दिसली नाही आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.     लोकलच्या धडकेत अहमदराजा याचा जागीच मृत्यू झाला, तर सादिकच्या डोक्याला मार लागल्याने त्याला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.    सादिकने डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या चौकशीत अपघात कुठे आणि दोघे रुळावरून का चालत होते, याची माहिती मिळाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातcentral railwayमध्य रेल्वेdombivaliडोंबिवली