कल्याणजवळील कांबा येथे आढळला आठ फुटांचा भला मोठा अजगर
By मुरलीधर भवार | Updated: November 24, 2023 16:42 IST2023-11-24T16:41:46+5:302023-11-24T16:42:13+5:30
वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करून लवकरच जंगलात सोडण्यात येणार

कल्याणजवळील कांबा येथे आढळला आठ फुटांचा भला मोठा अजगर
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण मुरबाड मार्गालगत असलेल्या कांबा गावाजवळ सुरु असलेल्या एका बांधकामच्या ठिकाणी काल रात्री एक भला मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे भला मोठा अजगर पाहून मजूरांमध्ये धावपळ झाली. याबाबत वॉर फाउंडेशनला संपर्क साधत माहिती देण्यात आली. प्राणी मित्र योगेश कांबळे, संतोष पंडागळे, पार्थ पठारे, अथर्व येरापनोर आणि प्रेम आहेर ह्यांनी त्वरित घटना स्थळी जाऊन अजगरची सुखरूप सुटका केली. या परिसरात पहिल्यांदाच इतका मोठा अजगर आढळून आला आहे. हा अजगर सुमारे ८ फूट लांबीचा असून त्याला वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती वैद्यकीय तपासणी करून लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे.