कल्याणमधील शाळेतील डान्स टिचरकडून एका अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न
By मुरलीधर भवार | Updated: August 21, 2023 19:20 IST2023-08-21T19:20:35+5:302023-08-21T19:20:49+5:30
पोलिसांनी डान्स टिचरला केली अटक

कल्याणमधील शाळेतील डान्स टिचरकडून एका अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न
कल्याण-एका पाच वर्षीय मुलावर लैगिंक अत्याचाराचा करण्याचा प्रयत्न डान्स टीचरने केल्याची घटना कल्याण पूर्वेतील एका नामांकित शाळेत घडली आहे. या प्रकरणी डान्स टिचर समीर कदम याला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र कल्याण पूर्वेतील गुन्हेगारी कधी थांबणार हा प्रश्न असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
एका नामांकित शाळेत शिकणाऱ््या एका पाच वर्षीय मुलगा याने शाळेतून परतल्यावर त्याच्यासोबत डान्स टीचरने काय केले हे त्यांच्या आई वडिलांना सांगितले. मुलाने सांगितलेला प्रकार ऐकून त्याच्या आई वडिलांना धक्काच बसला. त्याची व्यथा एकून आई वडिल चिंतेत पडले. मुलगा सांगत होता का, त्याच्यासोबत काही तरी अनैतिक प्रकार घडला आहे. या बाबत आई वडिलांनी शाळेत जाऊन विचारपूस करण्याचे ठरविले. मात्र ही घटना शुक्रवारी घडली होती. शनिवार रविवारी शाळा बंद होती. सोमवारी आई वडिल शाळेत पोहचले आणि शाळेला मुलासोबत काय घडले आहे ही माहिती दिली. मुलासोबत शाळेच्या शौचालयात लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्याच्यासोबत हे कृत्य शाळेतील डान्स टिचर समीर कदम याने केला होता.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी डान्स टिचर समीर कदमला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. मात्र ही अतिशय धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.