शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: July 9, 2024 23:09 IST

शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते.

कल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अपघातीमृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.काल मुंबई आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे ठाणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी कल्याण ते ठाणे आणि कर्जत ते ठाणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. गाड्या उशिराने धावत होता. कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे वास्तूविशारद अफजल फकीरा शेख (४५) काही महत्वाच्या कामानिमित्त वाशीला जाण्यासाठी निघाले. ते वाशीला गेले. त्याठिकाणी काम आटोपून शेख हे कल्याणच्या घरी येण्यासाठी वाशीहून निघाले. त्यांनी वाशीहून रेल्वे गाडी पकडली. ते ठाणे स्थानकात आले. ठाणे स्थानकात अमरावती एक्सप्रेसआली होती. त्यांनी त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा तोल गेल्याने ते फलाट आणि गाडीच्या ग’पमध्ये पडले. ही घटना रात्री नऊ वाजता घडली. जखमी झालेल्या शेख यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवघ्या अर्ध्या तासातच शेख यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. शेख यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांचा मुलगा एमपीएससीची परिक्षा देण्याची तयारी करीत आहे. एक मुलीने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. दुसरी मुलगी इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत आहे. शेख यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. शेख हे व्यवसायाने वास्तूविशारद असले तरी त्यांनी महाराष्ट्रतील दुष्काळग्रस्त भागात जाऊन अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम केले होते. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची मुले एखाद्या गुन्ह्याखाली तरुंगात गेल्यावर त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याचे ही काम त्यांनी केले होते.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यू