ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू
By अनिकेत घमंडी | Updated: March 27, 2024 18:31 IST2024-03-27T18:31:25+5:302024-03-27T18:31:43+5:30
अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किलगे यास शास्त्रीनगर इस्पितळात नेले, पण त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू
डोंबिवली: मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले रोहित किलगे(३०) यांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.४१ वाजेच्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किलगे हे ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. डोंबिवली येथून जलद लोकल पकडल्यानंतर कोपर दरम्यान पडून त्यांचा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किलगे यास शास्त्रीनगर इस्पितळात नेले, पण त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मयताची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर वारस येऊन ओळख पटवून गेले. गर्दी वाढत असून प्रवाशांनी स्वतःची तसेच सहप्रवाशाची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले.