शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:22 IST

सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

कल्याण : सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही बातमी कळल्यावर कार्यालय सोडून धावतपळत रुग्णालय गाठलेले निलंचर हे जमिनीवर कोसळले. धाय मोकलून रडू लागले. कामावर गेलो म्हणून आपण वाचलो, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. 

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साहू हे कुटुंबासह राहतात. कालच त्यांची सासू, मेहुणी त्यांच्या घरी आली होती. सकाळी निलंचर कामावर निघून गेले. दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी, सासू, मेहुणी यांचा मृत्यू झाला.  निलंचर म्हणाले की, मी कामावर गेलो म्हणून बचावलो. मात्र, माझी पत्नी, सासू आणि मेहुणी या तिघांचा मृत्यू झाला. माझी मुलगी बचावली असली तरी तिच्या डोक्यावरील मातेचे छत्र हरपले. एकाचवेळी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू ही आमच्यावरील मोठी आपत्ती आहे. असे काही होईल हे मला  स्वप्नातदेखील वाटले नव्हते. मला हे कळले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. माझ्या मुलीला मी कोणत्या तोंडाने सांगू की, तिची आई, मावशी आणि आजी  या जगात राहिली नाही, असे सांगताना निलंचर यांना हुंदका आवरला नाही.  

अग्निशमन दलाचे जवान हे एकामागून एक मृतदेह इमारतीच्या बाहेर काढत होते. तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी यांनी एकच टाहो फाेडला. मृत आणि जखमींमध्ये आपल्या घरातील कोणी नाही ना?, याची खातरजमा करण्याकरिता रहिवासी धडपडत होते. शेजारील इमारतीमधील रहिवासी शोकाकुल नातलगांना सांभाळत होते. 

 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात