दारु पार्टीत शिवी दिली म्हणून गोळी घालून मित्राची हत्या; दोन अटकेत दोन फरार
By मुरलीधर भवार | Updated: January 9, 2024 16:52 IST2024-01-09T16:52:33+5:302024-01-09T16:52:50+5:30
काही वेळातच पोलिसांनी रोहित भालेकर आणि समिर चव्हाण याला अटक केली.

दारु पार्टीत शिवी दिली म्हणून गोळी घालून मित्राची हत्या; दोन अटकेत दोन फरार
कल्याण-नशेखोरांची टोळी दारु प्यायला बसली. दारु पित असताना एकमेकांना शिव्या दिल्या. मित्रांमध्ये सुरु असलेला हा वाद इतका विकोपाला गेला की एकाने देशी कट्ट्याने गोळी मारुन राजन उर्फ जानू येरकर याची हत्या केली. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अटक केली आहे. अन्य दोन जण परवेज शेख आणि सुनिल वाघमारे यांचा पोलिस शोध घेत आहेत. चार पैकी तिघे सराईत गुन्हेगार आहेत.
टिटवाळा ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात पाच मित्र दारु पित बसले होते. रोहित भालेकर परवेज शेख, सुनिल वाघमारे, समिर चव्हाण आणि राजन येरकर यांची दारु पार्टी सुरु असताना राजन आणि एकात वाद झाला. एकमेकांना शिवी देत होते. या दरम्यान रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशी कट्टा काढून राजन येरकरवर गोळी चालविण्यास सुरुवात केली. या गोळीबारात राजन येरकर हा घटनास्थळीच ठार झाला. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंगटे यांच्या पथक आरोपीना शोधण्याकरीता निघाले. काही वेळातच पोलिसांनी रोहित भालेकर आणि समिर चव्हाण याला अटक केली. मात्र या प्रकरणातील सुनिल आणि परवेज हे दोघे अद्याप फरार आहे. या दोघांचा पोलिस शोध घेत आहे. या घटनेमुळे म्हारळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.